Wednesday, April 29, 2009

Free Auto Blogger Report

Wed 03:09 PM | Blog Loaded.
Wed 03:12 PM | Adding feed: http://marathahistorycalender.blogspot.com/
Wed 03:13 PM | Adding feed: http://feeds.feedburner.com/MarathiTube
Wed 03:13 PM | Starting Blog...
Wed 03:13 PM | Downloading 1 feed...
Wed 03:13 PM | Checking cache and filters...
Wed 03:13 PM | Posting 1 entry...
Wed 03:13 PM | Done! Feed items posted: 1. Ads posted: 0.


Read More...

[Source: - Posted by FreeAutoBlogger]

Eka Peksha Ek 3 Mega Final

No Description

Read More...

[Source: Marathi Tube - Posted by FreeAutoBlogger]

Sunday, February 3, 2008

Maaeri

Thursday, February 15, 2007

एक प्रश्न

एक दिवस मी तिज विचारले
माझ्या संगे येशील का?

माझ्या सुंदर स्वप्न नगरीत
भरभरुन साथ देशील का?

एका माझ्या हाकेवर धावत तु येशील का?
वाटले कधी एकटे तर कवेत मज घेशील का?

मोठया तुझ्या या मनात थोडीशी जागा देशील का?
न सांगताच माझ्या भावना तु समजुन घेशील का?

रस्त्यावर चालताना प्रेमळ सावली देशील का?
भरलेल्या मनाचे अश्रु ओंझळीत तु घेशील का?

गेला कधी तोल तर हळुच सहारा देशील का?
लागली कधी भुक तर प्रेमळ घास भरवशील का?

जीवनाच्या अंधारात प्रकाश तु होशील का?
प्रकाशाने त्या जीवन तेजोमय करशील का?

चुकलो कुठे प्रेमाने धपाटा मज देशील का?
सतत येणा-या वाद्ळांना लढायला मला लावशील का?

ह्या प्रश्नाची उत्तरे मज कधी मिळतील का
अनुत्तरीत प्रश्नांची तुच उत्तरं होशील का?

सरते शेवटी एकच वचन मज देशील का?
माझ्या जाण्याच्या घडीला दोन अश्रु ढाळशील का?

- सचिन पिसाळ

Wednesday, February 14, 2007

कधीतरी

कधीतरी उमगेल का कुणा जीवनाचे हे सुत्र
अश्रुंवर काबु आणि हसण्याचा हा मंत्र.

कधीतरी जमेल का कुणा पोहायला जीवनाच्या सागरात
लढायचे त्या लाटांशी आणि दु:ख ठेवावे उदरात.

कधीतरी जमेल का कुणा काबु त्या भावनांवर
ह्यदयाच्या त्या कोप-यात जेव्हा दु:ख होते अनावर.

कधीतरी जमेल का कुणा उंच आकाशात उडावे
सोडुन द्यावे मायाजाल आणि एकटेच जगावे.

कधीतरी जमेल का कुणा निखळ प्रेम कुणावर
समजुन त्याच्या भावना अर्पण जीवन त्यावर.

कधीतरी सुटेल का कुणा जीवनाचे हे गणित
जेथे सुख तर आहेत थोडी पण दु:ख अगणित.

कधीतरी येईल का एक दिवस जीवनात
कधीतरी हा एक शब्दच येईल संपुष्टात.

- सचिन पिसाळ

शब्द


शब्दांच्या पलिकडचे जग कुणी पाहिले का?
नाजुक त्या नात्यात शब्दांचे महत्व कोणी जाणलं का?


शब्दांच्या त्या गोड लडीत आजपर्यंत कोणा गुतंवले का?
गुतंलेल्या व्यक्तीला शब्दांनी कधी सावरले का?

शब्दांच्या त्या स्तबंतेतील भावनाना कोणी जाणलं का?
भावनाच्या त्या ओघात शब्दांना कोणी तारले का?

मुखातील गोड शब्दांना उचलुन कोणी धरलं का?
उचललेल्या शब्दांना मनाच्या कोप-यात कोणी ठेवले का?

निर्मल प्रेमाच्या शब्दांना कोणी आपलंस केले का?
आपलंस करुन जीवनभर जतन करुन ठेवले का?

शब्दांचे ते तीर मात्र परत फिरत नसतात,
तोडले कोणाचे हृदय तर परत जोडत नसतात.

शब्दच आहेत जे सर्व काही घडवतात,
पण बिघडवणारे पण शब्दच असतात.


एकही शब्द न बोलता तो प्रेमी बरेच काही बोलुन जातो,
शब्दांशिवायच आपले मन तिजपर्यंत पोहचवतो.

शब्दच तर आहेत आजपर्यंतची माझी शिजोरी,
शब्दांनीच तर आली आहे या कवितेला गोडी.


- सचिन पिसाळ

काल मी सहज भुतकाळात गेलो...

काल मी सहज भुतकाळात गेलो
आठवणीच्या भोव-यात असा फसलो
की भानावर यायचे विसरुनच गेलो
अश्रुवरचा ताबा सुट्ला, कंपने ह्यद्‍याची वाढली
गत जीवनाची छोटी स्वप्न डोळ्यांत उभी राहिली
स्वप्नाच्या त्या मोहक दुनियेत असा रमलो
की स्वत:लाच स्वत:हा मध्ये हरवुन बसलो

काल मी सहज भुतकाळात गेलो
जीवनाच्या त्या खड्तर वाटेवर साथ होती कुणा़ची
आयुष्याच्या त्या तीव्र उष्मात सावली होती मायेची
सावली, साथ दोन्ही हरवुन बसलो


काल मी सहज भुतकाळात गेलो
आठ्वली आजही ती संकटे,अंगावरती काटा येतो
सुखाची गोड स्वप्न पाहताना मात्र, त्याचा अंश सापडतो
संकटे,स्वप्ने दोन्ही हरवुन बसलो

काल मी सहज भुतकाळात गेलो
जीवनाशी झगडत झगडत पुढे सरकत राहीलो
सरकता सरकता मात्र पाउलखुणा मागे सोडत राहीलो
जिद्द,पाउलखुणा दोन्ही हरवुन बसलो.


भविष्याचा विचार आज मी वर्तमानात करतो
आयुष्याची घडी बसवण्याचा प्रयत्‍न आता मी करतो
भुतकाळाचा विचार सोडुन वर्तमानात जगतो.


- सचिन पिसाळ